शस्त्रास्त्र निर्यातीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. भारत हा सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयात करणाऱ्या देशांपैकी एक आहे. निर्यातीत आपला देश २३व्या क्रमांकावर आहे.
शस्त्रास्त्रांच्या निर्यातीत अमेरिका 1 क्रमांकावर. जगातील एकूण शस्त्रास्त्रांच्या निर्यातीपैकी 42% वाटा अमेरिकेचा. 2014-18 ते 2019-2023 पर्यंत शस्त्रास्त्रांची निर्यात 17% वाढली.
2019-23 मध्ये शस्त्रास्त्र विक्रीत फ्रान्सचा वाटा 11% होता. भारताने फ्रान्सकडून राफेल विमाने खरेदी केली आहेत. 2014-18 ते 2019-23 पर्यंत शस्त्रास्त्रांची निर्यात 47% वाढली आहे.
रशिया हा शस्त्रास्त्र निर्यात करणारा तिसरा मोठा देश. 2019-23 मध्ये जागतिक शस्त्रास्त्रांच्या विक्रीत त्याचा वाटा 11% होता. भारत, चीन, इजिप्त हे रशियन शस्त्रास्त्रांचे 3 आयातदार.
2019-23 मध्ये शस्त्रास्त्र विक्रीत चीनचा वाटा 5.8% होता. जगातील सर्वात मोठ्या 10 शस्त्रास्त्र आयातदारांच्या यादीत चीन 10 व्या क्रमांकावर आहे.
2019-23 मध्ये शस्त्रास्त्र विक्रीत जर्मनीचा वाटा 5.6% होता. संरक्षण उद्योगात Rhinemetal, Airbus आणि Krauss-Muffie Wegmann सारख्या कंपन्यांचे वर्चस्व आहे.
2019-23 मध्ये जगभरातील शस्त्रास्त्र विक्रीत इटलीचा वाटा 4.3% होता. येथील संरक्षण उद्योगात लिओनार्डो, फिनकेंटिएरी आणि ओटो मेलारा यांसारख्या कंपन्यांचे वर्चस्व आहे.
2019-23 मध्ये शस्त्रास्त्रांच्या विक्रीत यूकेचा वाटा 3.7% होता. येथील संरक्षण उद्योगात BAE Systems, Rolls-Royce आणि MBDA सारख्या कंपन्यांचे वर्चस्व आहे.
2019-23 मध्ये शस्त्रास्त्र विक्रीत स्पेनचा वाटा 2.7% होता. नवांतिया, इंद्रा सिस्टेमास आणि सांता बार्बरा सिस्टेमास सारख्या कंपन्या येथे आहेत.
2019-23 मध्ये शस्त्रास्त्र विक्रीत इस्रायलचा वाटा 2.4% होता. इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीज, राफेल ॲडव्हान्स्ड डिफेन्स सिस्टिम्स आणि एल्बिट सिस्टीम्स या येथील मोठ्या कंपन्या आहेत.
दक्षिण कोरिया हा दहाव्या क्रमांकाचा शस्त्रास्त्र निर्यातदार देश आहे. 2019-23 मध्ये जागतिक शस्त्रास्त्रांच्या विक्रीत त्याचा वाटा 2.0% होता.