काय सांगता...गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करायला ही कंपनी देतेय सुट्टी
World Sep 28 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Facebook
Marathi
प्रेयसीसोबत वेळ घालवण्यासाठी सुट्टी
थायलंडमध्ये अशी एक कंपनी आहे ज्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनोखी सुविधा दिली जात आहे. प्रेयसीसोबत रोमान्स आणि डेट करण्यासाठी कंपनी चक्क सुट्टी देतेय.
Image credits: Facebook
Marathi
कपल्सची तर मजाच
एका मार्केटिंग एजेंसीकडून कर्मचाऱ्यांना डेटिंगसाठी भरपगारी सुट्टी दिली जात असून त्याला टिंडर लीव्ह असे नाव दिले आहे. याअंर्गत डेट किंवा पार्टनरसोबत रोमान्स करता येणार आहे.
Image credits: Facebook
Marathi
डेटसाठी खास योजना
व्हाइटलाइन ग्रुप असे कंपनीचे नाव असून यांच्याकडून प्रेमी युगलुकांना पेड लीव्ह दिली जात आहे. कंपनीने ही योजना जुलै 2024 पासून सुरु केली आहे.
Image credits: Facebook
Marathi
पेड लीव्ह ऑफरसाठी मर्यादा
व्हाइटलाइन ग्रुपच्या टिंडर लीव्ह ऑफरचा लाभ अशाच कर्मचाऱ्यांना मिळणार आहे ज्यांनी डिसेंबर 2023 पर्यंत प्रोबेशन पीरियड पूर्ण केला आहे.
Image credits: Facebook
Marathi
सुट्टी देण्यामागील कारण
पेड लीव्ह देण्यामागील कारण असे की, कर्मचाऱ्याचे कामाकाजाच्या ठिकाणी मनं लागणे आणि खासगी आयुष्यातही मजा करण्याचा आहे.
Image credits: Facebook
Marathi
सुट्टी घेऊन पार्टनरसोबत एन्जॉय करा
ऑगस्ट 2024 मध्ये या ऑफरची घोषणा करत कंपनीने म्हले की, आमच्या कर्मचाऱ्यांना एखाद्यासोबत डेटला जाण्यासाठी टिंडर पेड लीव्हचा लाभ घेऊ शकतात.
Image credits: Facebook
Marathi
कशी मिळते सुट्टी?
कंपनीच्या टिंडर लीव्हसाठी काही अटही आहे. सुट्टीवर जाण्याच्या एक आठवडाआधी त्यासाठी अर्ज करावा असे कंपनीने म्हटले आहे.