ओडिशा सरकारने आयएएस अधिकारी अनु गर्ग यांची ओडिशाचे नवीन मुख्य सचिव म्हणून नियुक्ती केली आहे. त्या१९९१ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत.
एक महिला IAS अधिकारी ओडिशा प्रशासनाचा इतिहास बदलू शकते का? 1991 च्या बॅचच्या अनु गर्ग राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनल्या आहेत. जाणून घ्या संपूर्ण कहाणी.
ओडिशा सरकारच्या सामान्य प्रशासन आणि सार्वजनिक तक्रार विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेत याची पुष्टी करण्यात आली. त्या विद्यमान मुख्य सचिव मनोज आहुजा यांची जागा घेतील.
अनु गर्ग या ओडिशा केडरच्या 1991 च्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत. त्यांच्याकडे राज्य, जिल्हा आणि राष्ट्रीय स्तरावर 30 वर्षांपेक्षा जास्त प्रशासकीय अनुभव आहे.
सध्या अनु गर्ग या राज्य विकास आयुक्त पदावर कार्यरत आहेत, जे ओडिशामधील दुसरे सर्वोच्च प्रशासकीय पद आहे. त्या या पदावर नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या होत्या.
अनु गर्ग यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण, महिला आणि बाल विकास, श्रम आणि ESI यांसारख्या महत्त्वाच्या विभागांमध्ये आयुक्त-सह-सचिव आणि प्रधान सचिव म्हणून जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.
अनु गर्ग यांनी संबलपूर आणि बारगढमध्ये जिल्हाधिकारी आणि दंडाधिकारी म्हणून काम केले आहे, तर कालाहांडी आणि झारसुगुडा येथे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी म्हणून काम पाहिले आहे.
दिल्लीच्या लेडी श्री राम कॉलेजच्या माजी विद्यार्थिनी असलेल्या अनु गर्ग यांच्याकडे लखनौ विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी आणि अमेरिकेतील विद्यापीठाची मास्टर ऑफ पब्लिक हेल्थची पदवी आहे.