महाराष्ट्रात 12वी नंतर इंजिनिअरिंगच्या शाखेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आयआयटी बॉम्बे, आयसीटी, वीएनआयटी, डीआयएटी आणि इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, पुणे अशा कॉलेजचा समावेश आहे.
एनआयआरएफ 2023 रॅंकिंगच्या आधारावर महाराष्ट्रातील टॉप-5 इंजिनिअरिंग कॉलेजबद्दल जाणून घेऊया.
आयआयटी बॉम्बे बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी, मास्टर ऑफ टेक्नॉलॉजीसह इंजिनियरिंग कोर्ससाठी प्रसिद्ध आहे. याची फी 10 हजार रुपये ते 50 हजार रुपयांपर्यंत आहे.
विश्वेश्वरैया नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालय नागपूरात आहे. वीएनआयटी बीटेक, एमटेक आणि पीएचडीसह वेगवेगळे कोर्स महाविद्यालयात उपलब्ध आहे. येथे फी 2 लाख रुपयांपर्यंत आहे.
डिफेंस इंस्टिट्यूट ऑफ अॅडवान्स टेक्नॉलॉजी महाविद्यालय पुणे येथे आहे. या महाविद्यालयात पीएचडी आणि एमटेकचे शिक्षण घेता येऊ शकते. याच्या वार्षिक फी संदर्भात माहिती उपलब्ध नाही.
कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे भारतातील सर्वाधिक जुन्या इंजिनिअरिंग कॉलेजपैकी एक आहे. येथे COEP बीटेक, एमटेक आणि पीएचडी कोर्स करता येऊ शकतो. याची वार्षिक फी 1 लाख रुपयांपर्यंत आहे.
इंस्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी कॉलेज मुंबई येथे आहे. येथे बीटेक, एमटेक आणि पीएचडीसारखे कोर्स उपलब्ध आहेत. याची वार्षिक फी आयआयटीच्या तुलनेत कमी आहे.