बटाट्यामध्ये टायरोसीनचे मेलेनिनमध्ये ऑक्सिडेशनच्या कारणामुळे त्याचा रंग काळा पडतो. याशिवाय पोटेशियम, मॅग्नेशियम आणि बोरॉन मुळे बटाटा हा काळा पडत असतो.
बटाट्याला काळे पडण्यापासून आपल्याला थांबवायचे असेल तर बटाटा हा कापल्यानंतर पाण्यात आणि बेकिंग सोड्यामध्ये टाकून द्यावा. त्यामुळे बटाटा हा लवकर काळा पडत नाही.
पाण्यामध्ये मीठ टाकून बटाट्याला भिजत घालायला हवं, त्यामुळे बटाटा हा काळा पडत नाही.
आपण पाण्यामध्ये व्हाईट व्हिनेगर मिसळले आणि त्यामध्ये बटाटे कापल्यानंतर टाकून दिल्यास ते काळे पडण्याची शक्यता कमी होते.
आपण बटाट्याला शिजवत असताना लोखंड किंवा अल्युमिनियमच्या भांड्याचा वापर करू नका, त्यामुळे बटाटे काळे पडण्याची शक्यता निर्माण होते.