Amazon वर iPhone 15 वर खूप मोठी सूट आहे. 80 हजार रुपयांचा हा फोन तुम्ही 34 हजार रुपयांपर्यंत खरेदी करू शकता.
iPhone 15 चा 128GB व्हेरिएंट Amazon वर 79,600 रुपयांना लिस्ट झाला आहे. यावर 17% फ्लॅट डिस्काउंट उपलब्ध आहे. यानंतर फोनची किंमत 65,900 रुपये राहिली आहे. म्हणजे 13,700 रुपयांची बचत.
तुमच्याकडे ICICI बँक आणि SBI क्रेडिट कार्ड असल्यास तुम्हाला iPhone 15 वर 4,000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळू शकते. त्यानंतर या फोनची किंमत 61,900 रुपयांपर्यंत येते.
Amazon iPhone 15 वर एक्सचेंज ऑफर देखील देत आहे. त्यामुळे जास्त बचत होण्याची शक्यताय. जुन्या फोनच्या स्थितीनुसार, तुम्हाला 128GB व्हेरिएंटवर 27,525 रुपयांपर्यंत कमाल सूट मिळू शकते.
यानुसार, iPhone 15 च्या 128GB वेरिएंटवर एकूण 45,225 रुपये सूट मिळते. जर तुम्ही सर्व सवलतींचा लाभ घेतला तर तुम्हाला हा फोन फक्त 34,375 रुपयांमध्ये मिळू शकेल.
2023 मध्ये लॉन्च झालेल्या iPhone 15 चे डिझाईन उत्कृष्ट आहे. कंपनी IP68 रेटिंगसह वॉटर-रेसिस्टंट ग्लास बॅक आणि ॲल्युमिनियम फ्रेम देत आहे. 6.1-इंचाचा डिस्प्ले HDR10 सह येतो
iPhone 15 मध्ये A16 Bionic चिपसेट आहे. हा फोन iOS 17 सह प्री-इंस्टॉल केलेला आहे, जो iOS 18.1 पर्यंत अपडेट केला जाऊ शकतो. यात 6GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज पर्याय आहे.
iPhone 15 चा कॅमेरा खूप चांगला आहे. यात 48MP रुंद आणि 12-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड लेन्ससह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. फ्रंट कॅमेरा 12MP आहे.