सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर तुम्हाला एका क्लिकवर जगभरातील विविध गोष्टींबद्दल माहिती मिळते. पण अलीकडल्या काळात इंस्टाग्रामचे अकाउंट हॅक होण्याचे प्रकार वाढले आहेत.
सायबर हल्ला करणाऱ्या व्यक्ती सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवरुन लोकांच्या अॅक्टिव्हिटी ट्रॅक करत असतात. जे तुमच्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते.
अशातच इंस्टाग्रामचे अकाउंट हॅक होईल अशी सतत भीती वाटत असल्यास पुढील काही ट्रिक्स नक्की वापरा.
इंस्टाग्रामवर युजर्ससाठी वेगवेगळे फीचर्स दिले आहेत. यामध्ये अकाउंट प्रायव्हेट करण्याचाही पर्याय आहे. या फीचरच्या मदतीने अज्ञात व्यक्ती तुम्हाला फॉलो करू शकत नाही.
फेसबुक आणि इंस्टाग्राम पॅरेंट कंपनी आहे. यामुळे फेसबुकला इंस्टाग्राम लिंक करण्याची परवानगी आहे. पण अकाउंट हॅक होण्याची भीती असल्यास दोन्ही गोष्टी एकमेकांना लिंक करू शकता.
इंस्टाग्रामवर क्लोज फ्रेंड लिस्ट तयार करता येते. या फीचरमध्ये तुम्ही खास व्यक्तींनाच तुमची पोस्ट अथवा व्हिडीओ पाहण्याची परवानगी देता.