मेंदूचे आरोग्य वाढवणारे सात पदार्थ
फॅटी माशांमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असते. आठवड्यातून दोनदा सॅल्मनसारखे मासे खाल्ल्याने मेंदूचे संरक्षण होते.
अल्फा-लिनोलेनिक ॲसिड, व्हिटॅमिन ई आणि पॉलीफेनॉल असलेले अक्रोड मेंदूचे संरक्षण करते.
ब्लूबेरीमध्ये अँथोसायनिन्स असतात. ते स्मरणशक्ती वाढवतात. ब्लूबेरी स्मूदी किंवा शेक याद्वारे सेवन करता येते.
पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन के, फोलेट, ल्युटीन आणि बीटा-कॅरोटीन असते. हे सर्व मेंदूला रक्तपुरवठा वाढवतात.
अंड्यांमध्ये कोलीन असते. त्यात बी-व्हिटॅमिन्स देखील असतात जे मेंदूतील रसायने नियंत्रित करण्यास आणि मानसिक थकवा कमी करण्यास मदत करतात.
हळदीमधील कर्क्युमिन नावाचे संयुग मूड सुधारते आणि स्मरणशक्ती वाढवते.
भोपळ्याच्या बियांमधील मॅग्नेशियम, झिंक, लोह आणि तांबे स्मरणशक्ती कमी होणे आणि मानसिक समस्या दूर करतात.
१८ हजार रुपये कमी किंमतीत मिळणार हा प्रीमियम फोन, जाणून घ्या माहिती
'ही' आहेत लिव्हिंग रूमसाठी बेस्ट असलेली ७ इनडोअर रोपे
वजन कमी करण्यासाठी 'हे' आहेत 6 फायबरयुक्त फायदेशीर पदार्थ
२२ कॅरेट Gold Earings: हार्ट शेपचं इअरिन्ग करा खरेदी, लूक होईल वेगळा