डासांचा त्रास खूपच असतो. यामुळे अनेक आजार होतात. त्यामुळे डासांना पळवून लावणे महत्वाचे आहे.
रोझमेरीचा सुगंध डासांना पळवून लावतो. संध्याकाळी बाहेर बसताना रोझमेरी जाळल्यास डासांचा त्रास होणार नाही.
निलगिरीमध्ये युकॅलिप्टॉल आणि सिट्रोनेलॉल असते. हे दोन्ही डासांना पळवून लावतात. निलगिरीचे झाड लावा किंवा पाने कुटून ठेवा.
पचन आणि रोगप्रतिकारशक्तीसाठीच नाही तर डासांना पळवून लावण्यासाठीही तुळस चांगली आहे. तुळस युजेनॉल, एस्ट्रागॉल सोडते. हे डासांना पळवून लावते.
कपूर तुळशीचा वास डासांना आवडत नाही. ही कुटून हातावर लावल्यास डास जवळ येणार नाहीत.
झेंडूचा तीव्र कस्तुरीचा वास डास आणि इतर कीटकांना पळवून लावतो. घराबाहेर किंवा आत हे झाड लावू शकता.
लेमन ग्रासमध्ये तीव्र लिंबूवर्गीय सुगंध असतो. तो माणसाचा वास लपवतो. कुंडीत आणि उष्ण ठिकाणी लेमन ग्रास चांगले वाढते.
लव्हेंडरचा सुगंध माणसांना आवडतो. पण डास आणि कीटकांना तो त्रासदायक असतो.
Gold Rate Today सोन्याच्या दरात घसरण, 2K ने स्वस्त झाले सोने, हीच खरेदीची संधी
फणसाच्या बिया आहेत आरोग्याचा खजिना, वाचा कसे मिळवाल चमकदार त्वचा
10 मिनिटांत जाणून घ्या, फणस खाण्याचे आरोग्यदायी फायदे
उन्हाळ्यात काकडी खायलाच हवी.. पण काकडीसोबत खाऊ नये असे ३ पदार्थ!