धुतल्यावर कपडे जुने होतात. फिके पडलेले कपडे फक्त साबण आणि पावडर वापरून धुतल्याने चमकदार होत नाहीत. कपडे नवीनसारखे करण्यासाठी काही सोप्या टिप्स.
एक चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा व्हिनेगर पाण्यात मिसळा. त्यात शाम्पू किंवा साबणाची पावडर घालून फेस येईपर्यंत ढवळा आणि कपडे त्यात भिजत ठेवा.
बेकिंग सोडा, लिंबू आणि साबणाची पावडर पाण्यात मिसळून कपडे भिजत ठेवा. यामुळे कपड्यांवरील फिकटपणा जाऊन ते चमकदार होतात.
बेकिंग सोडा मिसळलेल्या पाण्यात थोडे दूध घातल्याने कपडे चांगले चमकतात.
पांढरे कपडे इतर कपड्यांसोबत धुवू नका. त्यामुळे पांढऱ्या कपड्यांचा रंग फिका पडू शकतो.
डाग असल्यास ते स्वच्छ केल्यानंतरच कपडे पाण्यात टाका. डाग आधीच काढले नाहीत तर ते इतर कपड्यांवर पसरू शकतात.
पांढरे कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुताना विशेष काळजी घ्या. योग्य पद्धतीने धुतले नाहीत तर ते लवकर फिके पडतात.
बादलीत थोडा व्हिनेगर घालून त्यात कपडे भिजत ठेवा. यामुळे फिके पडलेले कपडे नवीनसारखे होतात.
आज रविवारी टेस्टला द्या हटके ट्विट्स, बनवा 7 प्रकारचे Punjabi Stuff पराठे
आज रविवारी नाश्ट्यात तयार करा कुरकुरीत रवा डोसा, वाचा Tips
जाणून घ्या, पुरुषांमधील प्रोस्टेट कॅन्सरची लक्षणे, वेळीच व्हा सावध
आज शनिवारी हॉटेलसारखी चिकन करी बनवा घरच्या घरी, वाचा सोपी Recipe