प्रत्येक पालकाला आपल्या मुलाचे भविष्य सुरक्षित आणि उज्ज्वल व्हावे असे वाटत असते. यासाठी पालकांकडून काही योजनांमध्ये गुंतवणूक केली जाते.
तुम्हाला देखील तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासकीय योजनांमध्ये गुंतवणूक करायची असल्यास याचे काही पर्याय पाहूया.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वर्ष 2015 मध्ये सुकन्या समृद्धी योजना खास मुलींसाठी सुरू केली. या योजनेअंतर्गत 10 वर्षांखालील मुलींसाठी केवळ 250 रुपयात खाते सुरू करू शकता.
पीपीएफ खाते मुलांच्या नावे सुरू करू शकता. केवळ 500 रुपयांपासून यामध्ये गुंतवणूक करता येईल. वर्षाला दीड लाखांपर्यंत यामध्ये गुंतवणूक करता येते.
वर्ष 1993 मध्ये सुरू झालेल्या बालिका समृद्धी योजनेअंतर्गत द्रारिद्र्य रेषेखालील परिवारातील मुलींना जन्मापासून शासकीय आर्थिक मदत दिली जाते. याशिवाय मुलीच्या शिक्षणाचा खर्चही करते.
पाच वर्षांमध्ये मॅच्युअर होणारी राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनाही मुलांसाठी सुरू करू शकता. पोस्ट ऑफिसमध्ये एक हजार रुपयांत खाते उघडता येते.
किसान विकास पत्र योजनेत अल्पवयीन मुलांच्या नावावर गुंतवणूक करता येऊ शकते. गुंतवणूकीची रक्कम 115 महिन्यात दुप्पट होते.