नवी दिल्ली रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरीमुळे 18 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. यामध्ये महिला, मुलांचाही समावेश आहे.
रेल्वे स्थानकात प्रवाशांना तिकीट किंवा ट्रेनसंदर्भातील माहितीसाठी लांबलचक रांगेत उभे रहावे लागते. यामुळेच रेल्वेकडून नवे सुपर अॅप तयार करण्यात आले आहे.
भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी SwaRail नावाचे अॅप सुरू केले आहे. या अॅपमध्ये रेल्वेसंदर्भातील सर्व सुविधा मिळतात. यामुळे प्रवाशांना धक्काबुक्कीचा सामना करावा लागणार नाही.
स्वारेल अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना सहज तिकीट बुकिंग ते फूड ऑर्डर करता येणार आहे.
स्वारेलच्या मदतीने रिझर्व्हेशन ते जनरल तिकीटासाठी बुकिंग करता येऊ शकते.
जनरल तिकीटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ट्रेनची माहितीही अॅपमध्ये मिळणार आहे.
स्वारेल अॅप तुम्ही अॅन्ड्रॉइडच्या Play Store वर उपलब्ध आहे. येथून अॅप डाउनलोड करू शकता.