ICC ने वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कारासाठी खेळाडूंचे नामांकन जाहीर केले आहे. यामध्ये जागतिक क्रिकेटमधील ४ खेळाडूंना नामांकन देण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने या वर्षासाठी ४ टी-20 खेळाडूंची निवड केली आहे. यापैकी एकाला 'प्लेअर ऑफ द इयर' पुरस्कार मिळेल.
आयसीसीने जाहीर केलेल्या या यादीत ऑस्ट्रेलिया, झिम्बाब्वे, पाकिस्तान आणि भारतातील खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. 2024 साली T20I मध्ये त्यांची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे.
2024 हे वर्ष ट्रॅव्हिस हेडसाठी उत्तम वर्ष ठरले आहे. ज्यासाठी ICCने त्याला वर्ष 2024 च्या सर्वोत्तम खेळाडू पुरस्कारासाठी नामांकित आहे.
भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगचाही या यादीत समावेश झाला आहे. अर्शदीपने 2024 टी-20 वर्ल्ड कपमध्ये 17 विकेट घेतल्या होत्या.
झिम्बाब्वेचा आघाडीचा खेळाडू सिकंदर रझा याला आयसीसीने यावर्षीच्या T20I प्लेयर ऑफ द इयर पुरस्कारासाठी नामांकन दिले आहे. तो त्याच्या संघाचा कर्णधारही आहे.
या यादीत पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे. 2024 मध्ये बाबर आझमने 23 डावात 33.55 च्या सरासरीने 738 धावा केल्या आहेत.