बॉक्सिंग डे टेस्ट एक परंपरा आहे. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेत क्रिकेटसाठी हा दिवस अत्यंत खास मानला जातो. २६ डिसेंबरला मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे बॉक्सिंग डे टेस्ट मॅच खेळली जाते.
१९८५ साली मेलेबर्न क्रिकेट ग्राऊंडवर व्हिक्टोरिया व न्यु साऊथ वेल्स यांच्यात शेफील्ड शील्ड स्पर्धेचा समाना रंगला होता. तेव्हापासून आस्ट्रेलियात बॉक्सिंग डे सामन्याची उत्पत्ति झाली.
ख्रिसमसच्या दिवशी सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना दुसऱ्या दिवशी भेटवस्तू देण्याची परंपरा आहे. भेटवस्तूंनी भरलेले बॉक्स देणे यावरून या दिवसाचे नाव 'बॉक्सिंग डे' असे पडले
आस्ट्रेलियाचे मेलबर्न क्रिकेट ग्राउंड आणि दक्षिण आफ्रिकच्या सेंच्युरियन सुपरस्पोर्टस मैदानावर बॉक्सिंग डे कसोटी सामने खेळले जातात.
पहिला अधिकृत बॉक्सिंग डे कसोटी सामना १९५०-५१ साली ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात झाला होता. २८ धावांनी हा सामना जिंकत ऑस्ट्रेलियाने ४-१ असा मालिका विजय मिळवला होता.
MCG ही बॉक्सिंग डे टेस्टसाठी मुख्य स्थळ आहे. हे मैदान क्रिकेटच्या सर्वात ऐतिहासिक स्थळांपैकी एक आहे. या ठिकाणी झालेल्या सामन्यांमध्ये अनेक ऐतिहासिक क्षण घडले आहेत.
ऑस्ट्रेलिया या दिवशी आपला सामना आयोजित करते, आणि बहुतेक वेळा प्रतिस्पर्धी संघ म्हणून इंग्लंड, भारत, किंवा दक्षिण आफ्रिका असतो. भारतीय संघाने याठिकाणी स्मरणीय कामगिरी केल्या आहेत
ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी लोकांना क्रिकेट पाहण्यासाठी वेळ असतो, त्यामुळे प्रेक्षकांची गर्दीही मोठ्या प्रमाणावर होते. MCG वर 90,000 पेक्षा जास्त प्रेक्षक सामावू शकतात.