भारतीय फलंदाज शुभमन गिलला चौथ्या कसोटी सामन्यातून बाहेर ठेवण्यात आले आहे. बॉक्सिंग-डे कसोटीसाठी गिलचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश नव्हता.
शुभमन गिलची आशियाबाहेरची कामगिरी आतापर्यंत काही विशेष झाली नाही. त्याने २६ डावात २८.५० च्या सरासरीने ६८३ धावा केल्या आहेत. त्याच वेळी शेवटच्या ७ डावांमध्ये त्याची सरासरी १९.८३ आहे.
क्रिकेटर गिल हा उत्कृष्ट फलंदाज आहे आणि त्याने हे दाखवून दिले आहे. खूप कमी वयात त्यांनी कमाईच्या बाबतीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
गिल याची नेटवर्थ ३२ कोटी रुपये आहे. इतक्या लवकर एवढी मोठी कमाई करणे या खेळाडूची क्षमता दर्शवते.
या भारतीय फलंदाजासाठी केवळ क्रिकेट हेच उत्पन्नाचे साधन नाही, तर तो ब्रँड एंडोर्समेंटच्या माध्यमातून चांगली कमाईही करतो.
यावर्षी बीसीसीआयने गिलचा करार अ मध्ये समावेश केला आहे. त्यासाठी त्याला वर्षाला सात कोटी रुपये दिले जातात. गुजरात टायटन्सने त्याला आयपीएलमध्ये ८ कोटी रुपये दिले.
क्रिकेटर शुभमन गिल CEAT, Tata Capital, PhonePe, My 11 Circle सारख्या अनेक मोठ्या ब्रँड्सच्या जाहिराती देखील करतो. यासाठी तो मोठी रक्कम घेतो.