२०२४ च्या सुरुवातीला सानिया मिर्जाचा शोएब मलिकसोबत घटस्फोट झाला. क्रिकेटरने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी निकाह केला.
सना जावेद एक पाकिस्तानी अभिनेत्री आहे. ती उर्दू टीव्हीवर काम करते. यासोबतच तिने अनेक लोकप्रिय मालिकांमध्येही काम केले आहे.
२०१२ मध्ये 'शहर ए जात' या टीव्ही शोमधून तिने करिअरची सुरुवात केली. त्यानंतर तिने कहानी, रोमियो वेड्स हीर, डंक आणि डर खुदा सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.
सना जावेदने २०२४ च्या जानेवारी महिन्यात क्रिकेटर शोएब मलिकशी लग्न केले. यापूर्वी तिने गायक उमैर जायसवालशी लग्न केले होते. पण नंतर दोघे वेगळे झाले.
सध्या सना जावेद 'सुकून' या टीव्ही शोमध्ये दिसत आहे. 'कहानी' या रोमँटिक ड्रामात मुख्य भूमिका साकारल्याबद्दल तिला लक्स स्टाइल पुरस्कार मिळाला होता.