भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना सध्या चांगल्या फॉर्ममधे आहे. २०२४ च्या अखेरीस तिने ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजविरुद्ध चमकदार कामगिरी केली होती.
Image credits: Getty
Marathi
कामगिरीचे फळ मिळाले
२०२४ मध्ये स्मृती मानधनाने चार एकदिवसीय शतके नोंदवली. ती भारतीय महिला संघासाठी सर्वाधिक शतके झळकावणारी क्रिकेटपटू ठरली. त्याचे फळ आता तिला मिळाले आहे.
Image credits: Getty
Marathi
मोठी जबाबदारी मिळाली
२०२५ च्या सुरुवातीला स्मृती मानधना हिच्यावर आता मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तिच्याकडे आयर्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
Image credits: Getty
Marathi
हरमनप्रीतच्या जागी स्मृती
भारतीय निवड समितीने कर्णधार हरमनप्रीतला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे स्मृती मंधानाला कर्णधार बनवण्यात आले आहे.
Image credits: INSTA/indiancricketteam
Marathi
मालिका कधी सुरू होणार?
भारत आणि आयर्लंड यांच्यातील तीन वनडेंची मालिका १० जानेवारीपासून सुरू होत आहे. टीम इंडिया आपले सर्व सामने मायदेशातच खेळणार आहे