स्मृती श्रीनिवास मंधाना यांचा जन्म 18 जुलै 1996 झाला. त्या डावखुऱ्या फलदांज असून त्यांचा जगातील आघाडीच्या खेळाडूंमध्ये नंबर लागतो.
स्मृतीचा जन्म सांगली येथे एका क्रिकेटप्रेमी कुटुंबात झाला. तिच्या वडिलांनी आणि भावाने क्रिकेटमध्ये तिची रुची निर्माण केली. तिने 9 व्या वर्षी क्रिकेट प्रशिक्षण सुरू केले.
वनडे पदार्पण, 10 एप्रिल 2013, T20 पदार्पण: 5 एप्रिल 2013 तर टेस्ट पदार्पण: 13 ऑगस्ट 2014 मध्ये स्मृती यांनी केले.
2016 मध्ये स्मृतीने कर्नाटकाच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये रणजी सामन्यात द्विशतक झळकावले. हि तिच्या दृष्टीने महत्वपूर्ण कामगिरी होती.
स्मृती मंधाना हि संघाची नियमित सलामीवीर असून, सामन्यात संघाला भक्कम सुरुवात करून देते. ती भारतीय महिला संघाच्या यशामध्ये मोलाचा वाटा उचलते
ICC महिला ODI प्लेयर ऑफ द इयर, अर्जुन पुरस्कार तसेच अनेकदा ICC टीम ऑफ द इयरमध्ये निवड स्मृतीची निवड करण्यात आली आहे.