क्रिकेट जगतात महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली हे एक नावच नाही तर एक ब्रँडही आहेत. दोघांची लोकप्रियता खूप जास्त आहे
या स्टोरीद्वारे आम्ही तुम्हाला भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी अधिक श्रीमंत आहे की विराट कोहली त्याच्या पुढे आहे हे सांगणार आहोत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, धोनीची २०२४ मध्ये एकुण संपत्ती १०४० कोटी रुपये आहे. सर्वाधिक ब्रँड एंडोर्समेंटच्या यादीतही माही अव्वल आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, किंग कोहलीची वर्ष २०२४ मध्ये एकूण संपत्ती १०५० कोटी रुपये आहे. विराटचे नाव २०२४ मध्ये सर्वात श्रीमंत क्रिकेटर म्हणूनही नोंदवण्यात आले आहे.
कॅप्टन कूल गल्फ ऑइल, रिबॉक, पेप्सी यांसारख्या प्रसिद्ध कंपन्यांच्या जाहिराती करतो. धोनी जाहिरातीसाठी ३ ते ५ कोटी रुपये घेतो.
विराट कोहलीने ब्रँड एंडोर्समेंटच्या बाबतीतही खूप नाव कमावले आहे. विराट Adidas, Pepsi, Audi India, Myntra सारख्या कंपन्यांच्या जाहिराती करतो
दोघेही फिटनेसमध्ये पुढे आहेत. तंदुरुस्तीच्य बाबतीतही विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी एकमेकांपेक्षा कमी नाहीत. वयाची ४० ओलांडलेल्या दोन्ही खेळाडूंचा फिटनेस तरुण मुलांना टक्कर देतो.