भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर मालिका सुरू झाली आहे. दोन कसोटी सामने खेळले गेले ज्यात भारताने पहिला सामना जिंकला तर दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पुनरागमन केले.
आज आम्ही तुम्हाला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या इतिहासात आतापर्यंत सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या ५ फलंदाजांबद्दल सांगणार आहोत. या यादीत दिग्गज खेळाडू आहेत.
टीम इंडियाचा माजी फलंदाज मुरली विजय या यादीत पाचव्या स्थानावर आहे. या डावखुऱ्या सलामीच्या फलंदाजाने २००८ ते २०१८ पर्यंत BGT मध्ये १५ सामने खेळले असून १५ षटकार मारले आहेत
या यादीत भारतीय कर्णधार रोहित शर्माचेही नाव आहे. रोहित शर्माला सिक्सर किंग म्हटले जाते. रोहितने २०१४ पासून ११ BGT कसोटी सामन्यांमध्ये १५ षटकार मारले आहेत.
या यादीत भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी तिसऱ्या क्रमांकावर आहे. धोनीने २००७ ते २०१४ पर्यंत १९ सामने खेळले असून १६ षटकार मारले आहेत.
अव्वल ५ फलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज मॅथ्यू हेडन हा एकमेव खेळाडू आहे. हेडनने १८ कसोटी सामन्यांच्या ३५ डावात २४ षटकार ठोकले असून तो या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.
बॉर्डर-गावस्कर मालिकेत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. १९९६ ते २०१२ पर्यंत सचिनने बीजीटीमध्ये २५ षटकार ठोकले आहेत.