महेंद्रसिंग धोनी केवळ एक नावच नाही तर एक प्रसिद्ध ब्रँड बनला आहे. ब्रँड एंडोर्समेंटच्या बाबतीत धोनीने बॉलिवूडचे दिग्गज अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांनाही मागे टाकले आहे.
महेंद्रसिंग धोनी आता ४२ ब्रँड्ससोबत जोडलेला आहे. याआधी अमिताभ बच्चन यांनी ४१ ब्रँड साइन केले होते. तर शाहरुख खान ३४ ब्रँडसाठी काम करत आहे.
२०२० मध्ये धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. मात्र, तो अजूनही आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडल्यानंतरही माहीची ब्रँड व्हॅल्यू कमी झालेली नाही आणि मोठ्या कंपन्यांनी त्याला जाहिरातींसाठी साइन केले. तो या यादीत सर्वात पुढे आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, माजी भारतीय कर्णधार कंपनीच्या डीलसाठी ५ ते १० कोटी रुपये घेतो. अलीकडेच त्याने 'युरोपियन टायर्स' नावाच्या कंपनीशी करार केला आहे.
धोनीला चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल २०२५ साठी कायम ठेवले असून त्याचे वेतन ४ कोटी रुपये निश्चित केले आहे. त्याला अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवण्यात आले आहे.
रिपोर्ट्सनुसार धोनीची एकूण संपत्ती १०४० कोटी रुपये आहे. पेप्सी, गो डॅडी व रिबॉक सारख्या प्रसिद्ध कंपन्या त्याला प्रायोजित करतात. रांचीमध्ये 'माही रेसिडेन्स' नावाचे हॉटेलही आहे.