ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ट्रॅव्हिस हेडने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताविरुद्ध शतक झळकावले आहे. त्याचे कारकिर्दीतील हे आठवे शतक आहे.
ट्रॅव्हिस हेड जेव्हा-जेव्हा चर्चेत येतो तेव्हा त्याची पत्नी जेसिका डेविसची चर्चा नक्कीच होते.
ट्रॅव्हिस हेडची पत्नी जेसिका अवघ्या २५ वर्षांची आहे, पण संपत्तीत ती आपल्या पतीपेक्षा खूप पुढे आहे. ती एक व्यावसायिक महिला आहे.
हेडची पत्नी जेसिका हीचे अनेक हॉटेल्स आहेत. रिपोर्ट्सनुसार, तिची एकूण संपत्ती ४३ कोटी रुपये आहे. तर ट्रॅव्हिस हेडची एकूण संपत्ती ३० कोटी रुपये आहे.
ट्रॅव्हिस हेडची पत्नी बिझनेसवुमन तसेच मॉडेल आहे. सौंदर्याच्या बाबतीत ती हॉलिवूडच्या बड्या नायिकांशी स्पर्धा करते.
ट्रॅव्हिस हेड आणि त्यांची पत्नी जेसिका डेव्हिस एकाच शाळेत शिकले. १५ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
ट्रॅव्हिस हेड आणि जेसिका यांची २०२१ मध्ये एंगेजमेंट झाली. दोन वर्षांनंतर या जोडप्याने १५ एप्रिल २०२३ रोजी लग्नगाठ बांधली.
ट्रॅव्हिस हेड आणि जेसिका डेव्हिस यांना एक मुलगी मिला आहे. तिचा जन्म सप्टेंबर २०२२ मध्ये झाला. नोव्हेंबर २०२४ मध्ये जेसिका दुसऱ्यांदा आई झाली आणि तिने एका मुलाला जन्म दिला.
ट्रॅव्हिस हेड आणि जेसिका डेव्हिस यांच्या वयात ६ वर्षांचा फरक आहे. हेडचा जन्म २९ डिसेंबर १९९३ रोजी झाला होता, तर त्याची पत्नी जेसिकाचा जन्म ११ जुलै १९९९ रोजी झाला होता.