भारताचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या खूप चर्चेत आहे. अलीकडेच त्याच्या टीम मुंबईने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकली आहे
सूर्या सोशल मीडियावरही खूप सक्रिय दिसतो. अनेकदा त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून फोटो आणि व्हिडिओ शेअर केले जातात.
आता सूर्यकुमार यादव एका नव्या लूकमध्ये दिसला असून त्याने त्याचा फोटो त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. सूर्याने हेअरकट करून नवा लूक स्वीकारला आहे.
आपली नवीन हेअरस्टाईल केल्यानंतर सूर्या भाऊ किलर लूकमध्ये दिसत आहे. त्याची हेअर स्टाइल खूप आकर्षक आणि सुंदर दिसत आहे.
सूर्यकुमार आपल्या नव्या लुकने चर्चेत आला आहे. त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट इंस्टाग्रामवर आपल्या बार्बरसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे.
मिस्टर ३६० डिग्री बॅट्समनच्या नवीन हेअर लूकवर चाहते पसंती आणि कमेंट करत आहेत.त्याची स्टाइल लोकांना खूप आवडली आहे.
एका चाहत्याने सूर्याच्या नवीन हेअरस्टाइलवर 'डेंजरस लुक' लिहून कमेंट केली आहे. याशिवाय अनेक चाहते त्याच्या नवीन हेअरकटचे आपापल्या स्टाइलमध्ये कौतुक करत आहेत.