भारतीय क्रिकेटर हार्दिक पंड्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. जगात हार्दिकच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे.
हार्दिक पांड्या हा २०२४ मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च केला जाणारा भारतीय क्रिकेटर बनला आहे. अनेक गोष्टींमुळे तो चर्चेत राहिला आहे
या वर्षी पांड्या पत्नी नताशा स्टॅनकोविकपासून विभक्त झाला. तो क्षण त्याच्यासाठी वेदनांनी भरलेला होता. त्याला आपल्या पत्नीपासून तसेच मुलापासून वेगळे व्हावे लागले.
हार्दिक पांड्याचा मुलगा अगस्त्यला घेऊन नताशा तिच्या मायदेशी सर्बियाला गेली होती. १ महिन्यानंतर ती भारतात परतली. यानंतर हार्दिकने आपल्या मुलाची भेट घेतली.
आता हार्दिकने आपल्या मुलासोबतचा एक सुंदर फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये हार्दिक आणि त्याचा मुलगा दोघेही एकाच ड्रेस कोडमध्ये दिसत आहात. दोघांची पोझही सारखीच आहे.
हार्दिक पांड्याने या सुंदर फोटोवर एक अप्रतिम कॅप्शनही लिहिले आहे. ज्यात त्याने म्हटले आहे की, 'पिता-पुत्र एकत्र चिलिंग करत आहेत. दोघेही मस्त दिसत आहेत.'
हार्दिक पांड्या आणि त्याच्या मुलाचा फोटो चाहत्यांना खुप आवडला. एका यूजरने त्याला बेस्ट फादर असेही लिहिले आहे. आणखी काही चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.