अनुभवी फिरकीपटू आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. या घोषणेनंतर क्रिकेटप्रेमी भावूक झाले आहेत.
रविचंद्रन अश्विनची प्रेमकथा खूपच प्रेरणादायी आहे. त्याने आपल्या शाळेतील मैत्रीणीला आपला जीवनसाथी बनवले.
अश्विन आणि प्रीती नारायणन एकाच शाळेत शिकायचे. अश्विन पहिल्याच नजरेत तिच्या प्रेमात पडला. पण तो कधीच प्रेम व्यक्त करू शकला नाही.
क्रिकेटमुळे अश्विनला शाळा बदलावी लागली. असे असूनही प्रितीला भेटण्यासाठी तो कुठला ना कुठला बहाणा शोधायचा.
शालेय शिक्षण संपल्यावर दोघांचे कॉलेजही वेगळे झाले. पण जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा दोघेही भेटत असत. पण कॉलेजमध्येही दोघेही एकमेकांना प्रपोज करू शकले नव्हते.
यानंतर अश्विनचे संपूर्ण लक्ष क्रिकेटवर गेले. प्रीती एका इव्हेंट कंपनीत काम करू लागली. दोघेही आपापल्या विश्वात मग्न होते. पण देवाच्या मनात काही वेगळेच होते.
अश्विनला चेन्नई सुपर किंग्जकडून खेळण्याची संधी मिळाली. प्रीती या आयपीएल टीमचे सोशल मीडिया हँडल सांभाळत असे. सीएसकेच्या कार्यक्रमात दोघांना भेटण्याची संधी मिळाली.
या कार्यक्रमानंतर अश्विनने प्रीतीला प्रपोज करण्याचा निर्णय घेतला. १० वर्षांच्या मैत्रीनंतर त्याने प्रीतीला प्रपोज केले. तिनेही हो म्हटलं.
मैत्रीपासून सुरू झालेला हा सुंदर प्रवास कालांतराने प्रेमात आणि नंतर १३ नोव्हेंबर २०११ साली लग्नात बदलला. आता दोघेही दोन मुलींचे पालक झाले आहेत.