भारतीय महिला क्रिकेट संघाची प्रमुख खेळाडू स्मृती मानधना सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात तिने ७७ धावा केल्या आणि ती मालिकावीर ठरली.
ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटर एलिस पेरी स्मृती मानधनापेक्षा कमी नाही. टी २० मध्ये कोण कोणापेक्षा सरस आहे ते पाहूया. दोघीही त्यांच्या संघाच्या प्रमुख खेळाडू आहेत.
भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना हिची टी २० कारकिर्द शानदार ठरली आहे. तिने १४८ सामने खेळले आहेत आणि २९.३८ च्या सरासरीने ३७६१ धावा केल्या.
एलिस पेरी ही ऑस्ट्रेलियाच्या संघाची उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे. तिने १६२ टी-२० सामने खेळले असून ३.१६ च्या सरासरीने २०८८ धावा केल्या आहेत.
१४८ सामने खेळल्यानंतरही स्मृती मानधनाने एकही टी-२० शतक केलेले नाही. तिची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ८७ आहे. ती १२३.२७ च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करते.
एलिस पेरीने टी-२० मध्ये ११६.२५ च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली आहे. तिची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ७५ आहे. ती चांगली गोलंदाजीही करते व या फॉरमॅटमध्ये तिच्या १२६ विकेट्स आहेत.
स्मृती मानधना आणि एलिस पेरी या दोघी महिला प्रीमियर लीगमध्ये आरसीबीकडून खेळतात. त्यांनी २०२४ साली संघाला चॅम्पियन बनवले होते.