देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात शिंदे सहभागी होणार, काय आहे कारण?
Maharashtra Dec 04 2024
Author: vivek panmand Image Credits:social media
Marathi
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नव्या सरकारची होणार स्थापना
महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नव्या सरकारची स्थापना केली जाणार आहे. एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
Image credits: social media
Marathi
देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड
देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. भाजपाच्या आमदारांनी एकमताने फडणवीस यांची निवड केली.
Image credits: x
Marathi
तीनही नेत्यांनी केला सरकार स्थापनेचा दावा
तीनही नेत्यांनी सरकार स्थापनेचा दावा राज्यपालांकडे केला आहे. नव्या सरकारचा शपथविधी ५ डिसेंबर रोजी होणार आहे.
Image credits: social media
Marathi
तीनही नेत्यांनी पत्रकार परिषदेला केलं संबोधित
यावेळी बोलताना तीनही नेत्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केलं आहे.एकनाथ शिंदे आपल्यासोबत असतील असा दावा यावेळी फडणवीस यांनी केला.
Image credits: Our own
Marathi
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
नतेने दिलेल्या बहुमतामुळे आमची जबाबदारी आणखी वाढली आहे. देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री होत आहेत, याचा मला आनंद आहे. महायुतीमध्ये कोणीही लहान-मोठा नाही.
Image credits: Our own
Marathi
देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी स्वीकारली
फडणवीस म्हणाले की,. आमची जबाबदारी वाढली आहे. आपल्याला अधिक मेहनत करावी लागेल. लोकांच्या आमच्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करणे आव्हानात्मक असेल.
Image credits: Our own
Marathi
कार्यक्रमाला ४२ हजार लोक उपस्थित राहणार
कार्यक्रमात 42 हजार लोक सहभागी होणार असल्याचे भाजप नेत्याने सांगितले. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, 9 ते 10 केंद्रीय मंत्री आणि 19 मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.
Image credits: Our own
Marathi
पवार, फडणवीस आणि शिंदे घेणार शपथ
अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे तिघेही शपथ घेणार आहेत. बाकी मंत्र्यांचा शपथविधी काही काळाने होणार आहे.