'या' कारणामुळे मुख्यमंत्री पदाचे नाव उशीरा जाहीर, भाजपने केले स्पष्ट
Maharashtra Dec 04 2024
Author: Jagdish Bobade Image Credits:social media
Marathi
फडणवीस यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा
महायुतीत सुरू असलेला हायव्होल्टेज ड्रामा अखेर संपला. महायुतीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत फडणवीस यांची विधिमंडळ नेते पदावर निवड करण्यात आली आहे.
Image credits: social media
Marathi
मुख्यमंत्री पदाचे नाव जाहीर करायला उशीर का?
विधानसभा निकालानंतर मुख्यमंत्री पदाचे नाव जाहीर करण्यास इतका उशीर का झाला? असा प्रश्न साऱ्यांनाच पडला आहे. भाजपकडून यामागचे कारण सांगण्यात आले आहे.
Image credits: Our own
Marathi
...म्हणून नाव जाहीर करण्यास उशीर : निरिक्षक रुपाणी
आमची पार्टी सर्वानुमते निर्णय घेते. महायुतीत आम्ही निवडणूक लढवली. त्यामुळे सर्वांशी आम्ही बोललो, यामुळे निर्णय घ्यायला थोडा उशीर झाल्याचे भाजपचे निरीक्षक विजय रुपाणी म्हणाले.
Image credits: social media
Marathi
भाजप नेते चंद्रशेखर बानकुळे म्हणाले...
आमची पार्टी सामूहिक निर्णय घेणारी पार्टी आहे. आमची सर्वांशी चर्चा होते. म्हणून मुख्यमंत्री पदाचे नाव घोषित व्हायला उशीर झाल्याचे बावनकुळे म्हणाले.
Image credits: social media
Marathi
'एक है तो सेफ है' हे निकालानं केलं स्पष्ट : फडणवीस
एकमताने माझी विधिमंडळ गटनेतापदी निवड केली. 'एक है तो सेफ है' हे निवडणुकीच्या निकालानं स्पष्ट केलं. तर मोदी है तो मुमकीन है हे लोकसभेच्या निकालानंतर स्पष्ट झालं, असं फडणवीस म्हणाले
Image credits: social media
Marathi
५ डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणार शपथविधी
या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थितीत राहणार आहेत. शपथविधीला केंद्रीय मंत्री, राज्यपाल यांच्यासह केंद्रीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.