शपथविधी सोहळ्यासाठी ४ हजार पोलीस तैनात, कशी असेल सुरक्षा व्यवस्था?
Maharashtra Dec 04 2024
Author: Jagdish Bobade Image Credits:x
Marathi
पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार सहभागी
नवीन मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत. आझाद मैदानावर 4,000 हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. जाणून घेऊया सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्था
Image credits: x
Marathi
अशी असेल सुरक्षा
3,500 पोलीस, 520 अधिकारी, राज्य राखीव पोलीस दल (SRPF), क्विक रिॲक्शन टीम (QRT), दंगल नियंत्रण दल आणि बॉम्ब निकामी पथक यांचा बंदोबस्त असेल. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखरेख असेल.
Image credits: x
Marathi
अनेक मार्ग वळवण्यात आले
कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर काही मार्गांवर वाहतूक वळवण्यात आली आहे. 280 हून अधिक वाहतूक पोलिस वाहुतक सुरळीत ठेवतील
Image credits: x
Marathi
पोलिसांनी जनतेला केले विशेष आवाहन
आझाद मैदानावर पार्किंगची सुविधा नसल्याने पोलिसांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
Image credits: x
Marathi
भाजपा समर्थकांसाठी विशेष व्यवस्था
कार्यक्रमात 40 हजार भाजप समर्थकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय 2 हजार व्हीव्हीआयपी पाहुण्यांसाठी बसण्याची व्यवस्था असेल. विविध धर्माचे संत-महंत उपस्थित राहणार आहेत.
Image credits: x
Marathi
ठिकठिकाणी असेल सुरक्षा
वाहतूक कोंडी आणि संभाव्य सुरक्षेची चिंता लक्षात घेऊन आयोजकांनी विस्तृत व्यवस्था केली आहे. आझाद मैदान आणि मुंबईतील रस्त्यांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे
Image credits: x
Marathi
देवेंद्र फडणवीस यांची एकमताने नेतेपदी निवड
महायुतीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत फडणवीस यांची विधिमंडळाच्या नेत्याच्या पदावर निवड करण्यात आली आहे, ज्यामुळे त्यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.