पुण्याजवळचं स्वर्गाहूनही सुंदर ठिकाण, सुट्टीसाठी परफेक्ट डेस्टिनेशन
Maharashtra Sep 10 2025
Author: vivek panmand Image Credits:Facebook
Marathi
हे ठिकाण कुठं आहे?
पुण्यापासून साधारण १२० किलोमीटरवर सातारा जिल्ह्यात वसलेलं महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय हिल स्टेशन आहे. डोंगर, धुकं आणि हिरवाई यासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.
Image credits: Facebook
Marathi
निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य
महाबळेश्वरमध्ये २५ पेक्षा जास्त पॉइंट्स आहेत जिथून सह्याद्रीच्या रांगांचे अप्रतिम दृश्य दिसतं. धुक्याने भरलेली दरी आणि सूर्यास्ताचे क्षण पर्यटकांना मोहवून टाकतात.
Image credits: Facebook
Marathi
महाबळेश्वरमध्ये काय पाहाल?
येथील अर्थर सीट पॉइंट, केट्स पॉइंट, एलिफंट्स हेड पॉइंट खूपच प्रसिद्ध आहेत. याशिवाय व्हेण्णा लेकवर बोटिंगचा आनंद घेता येतो.
Image credits: Facebook
Marathi
खास चव – स्ट्रॉबेरी आणि आईस्क्रीम
महाबळेश्वरला गेलं आणि स्ट्रॉबेरी खाल्ली नाही तर ट्रिप अपूर्णच! इथली स्ट्रॉबेरी, स्ट्रॉबेरी विथ क्रीम, जॅम्स आणि आईस्क्रीम खूप लोकप्रिय आहेत.
Image credits: Facebook
Marathi
कसं पोहोचाल?
पुण्यातून थेट गाडी किंवा बसने महाबळेश्वरला जाता येतं. साधारण ३-४ तासांचा प्रवास असून हिवाळा आणि उन्हाळ्यात येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक जातात.