छत्रपती शिवाजी महाराज यांनी कोणत्या ठिकाणी युद्ध केलं?
Maharashtra Feb 23 2025
Author: vivek panmand Image Credits:Pinterest
Marathi
तोरणा किल्ला स्वारी (1646)
वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली.
Image credits: Pinterest
Marathi
पहिला पुणे मोहिम (1647-1648)
कोंढाणा (सिंहगड), पुरंदर आणि रोहिडा हे किल्ले स्वराज्यात आणले. आदिलशाहीचा विरोध झुगारत स्वराज्य विस्तार सुरू केला.
Image credits: Pinterest
Marathi
प्रतापगडचे युद्ध (10 नोव्हेंबर 1659)
अफजलखानाच्या वधानंतर झालेल्या लढाईत शिवाजी महाराजांनी विजयी होत मराठ्यांच्या सामर्थ्याची पहिली मोठी चुणूक दाखवली. मराठ्यांनी आदिलशाही सैन्याचा पराभव केला.
Image credits: Pinterest
Marathi
पावनखिंडीचे युद्ध (1660)
बापूजी मुजुमदार व बाजीप्रभू देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी शत्रूला रोखून धरले. शिवाजी महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले, पण बाजीप्रभूंचे बलिदान झाले.
Image credits: Pinterest
Marathi
शाहिस्तेखानावरील हल्ला (1663)
मुघल सरदार शाहिस्तेखान पुण्यातील लाल महालात राहत होता. महाराजांनी अचानक हल्ला करून त्याला तीन बोटे तोडून मुघल सैन्याचा पराभव केला.
Image credits: Pinterest
Marathi
सुरतेची लूट (1664)
मुघल साम्राज्याच्या संपत्तीचा स्रोत असलेल्या सुरत शहरावर स्वारी करून मोठ्या प्रमाणात संपत्ती मिळवली. औरंगजेबाच्या विरोधात मराठ्यांचे बळ वाढले.
Image credits: Social Media
Marathi
पुरंदरचा तह आणि मुघल संघर्ष (1665-1666)
राजपूत सरदार जयसिंग याच्या नेतृत्वाखालील मुघल फौजेशी संघर्ष. महाराजांना 23 किल्ले मुघलांना सोडावे लागले. पुढे आग्र्याला कैद झाल्यावरही महाराजांनी युक्तीने सुटका करून घेतली.