छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांनी कोणत्या लढाया जिंकल्या?
Maharashtra Feb 14 2025
Author: vivek panmand Image Credits:Getty
Marathi
स्वराज्याची सुरुवात
१६ वर्षांचे असताना, शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्य स्थापनेची पहिली पायरी ठेवली. गुप्त रणनीतीने मोगलांकडून तोरणा जिंकला आणि राजगड, पुरंदर, रोहिडा हे किल्लेही घेतले.
Image credits: social media
Marathi
अफजलखान वध आणि प्रतापगडची लढाई
विजापूरचा सेनापती अफजलखान स्वराज्य उद्ध्वस्त करण्यासाठी १०,००० फौज घेऊन आला. त्यांनी अफजलखानाला युक्तीने ठार मारले आणि प्रतापगडच्या लढाईत विजापूरच्या सैन्याचा मोठा पराभव केला.
Image credits: social media
Marathi
सिद्धी जौहरविरुद्ध पन्हाळगड लढाई
पन्हाळगडातून युक्तीने निसटून विशाळगडावर पोहोचले आणि बाजीप्रभू देशपांड्यांच्या मदतीने मोठा विजय मिळवला. विजापूरच्या सिद्धी जौहरने पन्हाळगडाला वेढा दिला.
Image credits: freepik
Marathi
शाहिस्तेखानावरील हल्ला
मुघलांचा सेनापती शाहिस्तेखान पुण्यात राहून मराठ्यांना त्रास देत होता. मध्यरात्री लाल महालावर हल्ला करून शाहिस्तेखानाची बोटं कापली आणि मुघल सैन्याला पळवून लावले.
Image credits: social media
Marathi
सुरतची लूट
सुरत हे मुघलांसाठी महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते. त्यांनी केवळ ६ दिवसांत संपूर्ण सुरत लुटली आणि मुघलांच्या खजिन्यावर मोठा आघात केला.
Image credits: social media
Marathi
पुरंदरच्या लढाईत मुघलांना तगडा विरोध
मुघल सरदार मिर्झा जयसिंग आणि दिलेरखान यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा दिला. हा एक संघर्षमय युद्ध होता. शिवाजी महाराजांनी तह करून काही किल्ले दिले, पण पुढे त्यांनी परत घेतले.
Image credits: f reepik
Marathi
सिंहगडाची लढाई
मुघलांनी सिंहगड ताब्यात घेतला होता. तानाजी मालुसरे यांच्या बलिदानानंतर सिंहगड मराठ्यांनी परत जिंकला. शिवाजी महाराजांनी सांगितले – "गड आला पण सिंह गेला!"