महाराष्ट्रात आपण या ५ रोड ट्रिप पहा करून, नवीन वर्ष होऊन जाईल फ्रेश
Maharashtra Jan 08 2026
Author: vivek panmand Image Credits:Pinterest
Marathi
मुंबई ते लोनावळा
मुंबई–पुणे एक्सप्रेस वेवरील ही रोड ट्रिप अतिशय लोकप्रिय आहे. धबधबे, हिरवीगार डोंगररांग आणि थंड हवा यामुळे हा प्रवास खास ठरतो.
Image credits: Instagram
Marathi
मुंबई ते अलीबाग
समुद्र किनाऱ्याची मजा घ्यायची असेल तर मुंबई ते अलीबाग रोड ट्रिप उत्तम आहे. मुरुड-जंजिरा किल्ला आणि शांत समुद्रकिनारे आकर्षण ठरतात.
Image credits: Social media
Marathi
पुणे ते महाबळेश्वर
घनदाट जंगल, वळणावळणाचे रस्ते आणि थंड हवामान यामुळे ही रोड ट्रिप अविस्मरणीय ठरते. स्ट्रॉबेरी फार्म्स आणि व्ह्यू पॉइंट्स खास आहेत. आपण महाबळेश्वरला सनसेट पाहून आनंद घेऊ शकता.
Image credits: Instagram
Marathi
छत्रपती संभाजीनगर ते अजिंठा वेरूळ
इतिहासप्रेमींकरिता ही रोड ट्रिप परफेक्ट आहे. जागतिक वारसा स्थळ असलेली अजिंठा आणि वेरूळ लेणी पर्यटकांना भुरळ घालतात.
Image credits: Pinterest
Marathi
नाशिक ते इगतपुरी
पावसाळ्यात खास लोकप्रिय असलेली ही रोड ट्रिप धबधबे, घाटरस्ते आणि निसर्गसौंदर्याने मन जिंकते. ट्रेकिंगसाठीही हा परिसर प्रसिद्ध आहे. नाशिक परिसरात आपण वायनरी ट्राय करून पाहू शकता.
Image credits: Social media
Marathi
कोल्हापूर ते आंबोली घाट
घनदाट जंगल, धुके आणि थंड वातावरण यामुळे ही रोड ट्रिप रोमांचक ठरते. आंबोली धबधबा हे मुख्य आकर्षण आहे. कोल्हापूरला आपण महालक्ष्मीचं दर्शन घेऊन घरी याल.