Marathi

विठ्ठलाच्या पादुका लंडनमध्ये पोहचल्या, एकादशी सोहळा रंगणार

Marathi

मराठी माणसांनी केलं उत्साहात स्वागत

एकादशी वारीच्या निमित्ताने वारकरी पंढरीच्या दिशेने निघाले आहेत. मात्र देशाच्या सीमा ओलांडून पांडुरंगाच्या पादुका पहिल्यांदाच लंडनमध्ये पोहचल्या आहेत.

Image credits: social media
Marathi

लंडनमध्ये आषाढी साजरी होणार

सत्तर दिवस प्रवास करून या वारीन जवळपास एक लाख लोकांना जोडलं आहे. लंडन येथे आषाढी एकादशी साजरी केली जाणार असून पंढरपूरचे मंदिर बांधण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे.

Image credits: social media
Marathi

१४ एप्रिल रोजी वारीला झाली होती सुरुवात

१४ एप्रिल रोजी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या पादुकांचं विधिवत पूजन करून या वारीला सुरुवात झाली. ७० दिवस २२ देश १८ हजार किलोमीटर प्रवास करून ही पालखी जगप्रसिद्ध अशा लंडन ब्रीज जवळ पोहचली

Image credits: social media
Marathi

मराठमोळ्या पद्धतीनं करण्यात आलं स्वागत

पंढरपुरवरून निघालेल्या या दिंडीचे स्वागत विविध देशांमध्ये विधिवत पद्धतीन करण्यात आलं. युरोपमध्ये रांगोळ्या, पारंपरिक वेशभूषा केलेले भक्त, डोक्यावर तुळस घेतलेल्या महिला अस दृश्य होत

Image credits: social media
Marathi

दोन महिने कार्यक्रम साजरा होणार

आषाढी एकादशीचा कार्यक्रम दोन महिने युरोपमध्ये साजरा केला जाणार आहे. बेल्जीयममध्ये एका मराठी माणसाने विठ्ठलाचे मंदिर बांधले असून तेथे पादुकांचा दर्शन सोहळा कार्यक्रम पार पडला आहे.

Image credits: social media

पंढरपूरच्या वारीतील रिंगण म्हणजे काय, माहिती जाणून घ्या

पंढरपूरच्या वारीत गेल्यानंतर वारकऱ्याच्या आयुष्यात कोणते बदल होतात?

वारकऱ्यांचं आणि माऊलीचं आहे खास नातं, आषाढी एकादशीच महत्व जाणून घ्या

Bhushi Waterfall: लोणावळा जवळचा भुशी धबधबा पहिला का, कधी जायला हवं?