सुधा रेड्डी या पीव्ही कृष्णा रेड्डी यांच्या पत्नी आहेत.मेघा इंजिनियरिंग, इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे संस्थापक आहेत.यंदाच्या मेट गालात सुधा यांची एन्ट्री झाल्याने चर्चा रंगल्या आहेत.
मेट गालामध्ये सुधा यांनी अतिशय सुंदर पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे. हा सुंदर गाऊन तयार करण्यासाठी 4500 तास लागले आणि 800 हून अधिक कारागिरांनी हा सुंदर गाऊन हाताने बनवला आहे.
सुधाचा गाऊन फॅशन डिझायनर तरुण तहलियानी यांनी तयार केला. जो कार्यक्रमाच्या स्लीपिंग ब्युटी: री-वॉकिंग फॅशन या थीमसाठी योग्य होता. यात लॉन्ग स्लिव्हमध्ये संपूर्ण वर्क करण्यात आले आहे
सुधा रेड्डी यांच्या दागिन्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.180 कॅरेटचा डायमंड नेकलेस घातला होता. त्यात 25 कॅरेट हृदयाच्या आकाराचा हिरा,आणखी तीन 20 कॅरेट हृदयाच्या आकाराचे हिरे होते.
180 कॅरेट डायमंड नेकलेस व्यतिरिक्त, सुधा रेड्डी यांनी 23 कॅरेट आणि 20 कॅरेट डायमंड सॉलिटेअर फिंगर रिंग घालून तिचा लूक पूर्ण केला.
रिपोर्ट्सनुसार, सुधा रेड्डी यांच्या हिऱ्याच्या नेकलेसची किंमत सुमारे 20 मिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास 165 कोटी रुपये आहे.
यापूर्वी, सुधा रेड्डी मेट गाला 2019 मध्ये सहभागी होणारी एकमेव भारतीय महिला बनली होती.