महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरविण्यास का होतोय विलंब?, ही 5 प्रमुख कारणे
Maharashtra Dec 03 2024
Author: Rameshwar Gavhane Image Credits:Twitter
Marathi
एकनाथ शिंदे यांना पाहिजे मुख्यमंत्री पद
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदावर आपला ठाम दावा केला आहे. शिंदेंचा विश्वास आहे की तेच योग्य उमेदवार. त्यांना मुख्यमंत्री पद दिले नाही तर ते उपमुख्यमंत्री होणार नाहीत
Image credits: Twitter
Marathi
शिंदेंना मुख्यमंत्री पद नाही दिले तर पाहिजे गृहमंत्री पद
जर शिंदेंना मुख्यमंत्री पद मिळाले नाही, तर त्यांना गृहमंत्री हे महत्वाचे पद हवंय. गृहमंत्री पदावर होणाऱ्या दाव्यामुळे चर्चांना वेग आला आहे.
Image credits: Twitter
Marathi
अजित पवार यांना पाहिजे महत्वाची मंत्री पदे
अजित पवार देखील मंत्रिमंडळात महत्त्वाची भूमिका घेण्यास इच्छुक आहेत. पवार अर्थसंकल्पासाठी, विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहेत, त्यांनी महत्त्वाच्या मंत्री पदांवर दावा केलाय
Image credits: Facebook
Marathi
मुख्यमंत्री पद सोडायला भाजपचा नकार
भाजपने मुख्यमंत्री पद सोडण्यास स्पष्टपणे नकार दिलाय. भाजपने राज्यातील सत्ता कायम राखण्याची इच्छा दर्शविली. भाजपला हे पद सोडायचं नसल्याने, राज्यात अडचणींना सामोरे जावे लागतेय.
Image credits: Twitter
Marathi
भाजपचा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पदावर दावा
भाजपने मुख्यमंत्री, गृहमंत्री पदावर आपला दावा ठोकलाय. ही दोन्ही महत्वाची खाती भाजपला हवी आहेत. मुख्यमंत्री, गृहमंत्री ही अतिमहत्वाची पदे भाजपने सोडायला नकार दिलाय.