महाराष्ट्रात महायुती आघाडीच्या विजयानंतर CM कोण होणार याची मुंबईपासून दिल्लीपर्यंत चर्चा सुरूय. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या आमदारांना आपापल्या नेत्यांना मुख्यमंत्री करायचे आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार देवेंद्र फडणवीस पुन्हा महाराष्ट्राचे सीएम होणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील एका सूत्राने सांगितले की, भाजप हायकमांड,आरएसएसने मिळून हा निर्णय घेतलाय.
संघाच्या सूत्रानुसार, पहिली अडीच वर्षे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील, त्यानंतर पुढील अडीच वर्षांसाठी शिवसेनाप्रमुख एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील.
अडीच वर्षांनी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नवी जबाबदारी सोपवली जाईल, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. म्हणजेच त्यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष केले जाणार आहे.
राष्ट्रवादीच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचे उघड समर्थन केले आहे. आमचा पक्ष त्यांना पाठिंबा देतो.
पहिली अडीच वर्षे फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास एकनाथ शिंदे खूश होतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अडीच वर्षानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचे गणित वेगळे असेल. हे केवळ वेळच सांगेल.