मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने राबवल्या जाणाऱ्या लाडकी बहीण योजनेतील महिलांची दिवाळी गोड होणार आहे. त्यांना सरकारकडून बोनस दिला जाणार आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना ५,५०० रुपये लाभ मिळणार आहे. ३,००० रुपये ही रक्कम स्वतंत्र दिली जाणार असल्याचं सरकारने सांगितलं आहे.
लाडकी बहीण योजनेतून नियमांचे पालन केलेल्या प्रत्येक महिलेला १५०० रुपये दिले जाणार आहेत. त्यासाठी महिलेचे उत्पन्न हे २.५ लाखांच्या आत आणि वय २१ ते ६० च्या दरम्यान असायला हवे.
आधार कार्ड, अधिवात/जन्म प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, अर्जदाराने हमीपत्र, बँक पासबुक आणि अर्जदाराचा फोटो हा कागदपत्रे लागतात.