राज्यात आज 6 दसरा मेळावे, मनोज जरांगेंचा मराठा मेळावा कोठे होणार?
Maharashtra Oct 12 2024
Author: Rameshwar Gavhane Image Credits:social media
Marathi
मनोज जरांगेंच्या नेतृत्वात मराठ्यांचा दसरा मेळावा
मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात पहिल्यांदाच मराठ्यांचा दसरा मेळावा होत आहे. बीडजवळील नारायण गडावर मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणारय. दसरा मेळावा दुपारी 1 वाजताच्या सुमारास होणार आहे.
Image credits: social media
Marathi
कोल्हापूरचा शाही दसरा सोहळा
छत्रपती शाहू महाराज, संभाजीराजे छत्रपती यांच्यासह शाहू महाराजांच्या कुटुंबीयांकडून दसरा मेळावा साजरा केला जातो. सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास हा दसरा सोहळा साजरा होणार आहे.
Image credits: social media
Marathi
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा
नागपुरात आरएसएसचा दसरा मेळावा होणारय. आरएसएसची स्थापना सप्टेंबर 1925 मध्ये केशव बलिराम हेडगेवार यांनी दसऱ्याच्या दिवशीच केली होती. त्यामुळे स्थापनेपासून दसरा मेळाव्याचे आयोजन.
Image credits: social media
Marathi
शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा
शिवसेना उबाठा गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क येथे होणार आहे. शिवसेना उबाठा गटाच्या अधिकृत 'X' अकाउंटवरून टीजर प्रदर्शित. 'वाजत गाजत, गुलाल उधळत या!' असे आव्हान शिवसैनिकांना केले.
Image credits: social media
Marathi
एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेचा दसरा मेळावा
शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा मुंबईच्या आझाद मैदानात होणार. विधानसभा निवडणुकीमुळे शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शन. 12 ऑक्टोबरला सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास मेळाव्याला सुरुवात होणार आहे.
Image credits: social media
Marathi
भगवानगडावर पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा
मंत्री धनंजय मुंडे आणि आमदार पंकजा मुंडे तब्बल 12 वर्षांनंतर भगवानगडावरील दसरा मेळाव्यात एकत्र येणार आहेत. दुपारी 1 ते 2 वाजताच्या सुमारास हा दसरा मेळावा होणार आहे.