कळसूबाई ट्रेकला जायचा विचार करताय, ट्रेकची माहिती जाणून घ्या
Maharashtra Jun 21 2025
Author: vivek panmand Image Credits:social media
Marathi
महाराष्ट्राचं सर्वोच्च शिखर
कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे ५४०० फूट (१६४६ मीटर) उंच असलेलं हे ठिकाण निसर्गप्रेमी, ट्रेकर्स आणि साहसप्रेमींना आकर्षित करत असतं.
Image credits: social media
Marathi
कळसुबाई देवीचं मंदिर
शिखरावर कळसुबाई देवीचं प्राचीन मंदिर आहे. स्थानिक लोक देवीला "कळसुबाई माते" म्हणून पूजतात आणि दरवर्षी येथे मोठ्या संख्येने भाविक येतात.
Image credits: social media
Marathi
ट्रेकिंगचा थरार
कळसुबाई ट्रेक मध्यम ते कठीण श्रेणीत मोडतो. ट्रेकसाठी प्रमुख मार्ग बारी गावातून सुरू होतो. पावसाळ्यात हा ट्रेक आणखीनच सुंदर होतो. धुके, झरे आणि हिरवाई यामुळे अनुभव अविस्मरणीय होतो.
Image credits: social media
Marathi
निसर्गरम्य परिसर आणि दृश्यं
टॉपला पोहोचल्यावर तुम्हाला साह्याद्रीच्या डोंगररांगा, भंडारदरा धरण, रतनगड, हरिश्चंद्रगड, यांचे अद्वितीय दृश्य दिसतं. सूर्योदय आणि सूर्यास्ताचे क्षण फारच मोहक असतात.
Image credits: social media
Marathi
जायची योग्य वेळ कोणती आहे?
कळसुबाईला जाण्यासाठी मुंबई किंवा पुण्याहून घोटी – इगतपुरी मार्गे बारी गाव गाठता येतं. ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी ट्रेकिंगसाठी योग्य मानला जातो.
Image credits: social media
Marathi
कोणती काळजी घ्यावी?
ट्रेकिंगसाठी योग्य शूज वापरा. पाण्याची बाटली, स्नॅक्स आणि रेनकोट जवळ ठेवा. गाइडसोबत ट्रेक केल्यास अधिक सुरक्षित. रात्रीचा ट्रेक टाळावा