घरात कोणत्या दिशेला शूज-चप्पल ठेवणे अशुभ, वाचा वास्तू टिप्स
Lifestyle Dec 16 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Getty
Marathi
चप्पल-शूजमुळे बिघडते नशीब
वास्तुशास्रानुसार, शूज-चप्पल घरातील योग्य दिशेला न ठेवल्यास त्याचा आयुष्यावर नकारात्मक परिणाम होतो. जाणून घेऊया घरात कोणत्या ठिकाणी शूज-चप्पल ठेवू नये...
Image credits: Getty
Marathi
शूज-चप्पलमुळे नकारात्मक उर्जा येते
घराच्या मुख्य दरवाज्यावर बहुतांशजण शूज-चप्पल काढतात. पण यामुळे घरात नकारात्मक उर्जा येते.
Image credits: Getty
Marathi
घरातील मंडळींवर पडतो प्रभाव
शूज-चप्पलमुळे निघालेली नकारात्मक उर्जा वास्तूसह घरातील मंडळींवर प्रभाव टाकते. यामुळे होणारी कामे होत नाहीत.
Image credits: Getty
Marathi
मुख्य दरवाज्यावर काढू नका शूज
मुख्य दरवाज्यावर शूज काढणे म्हणजे समस्यांना स्वत:हून आमंत्रण देण्यासारखे आहे. यामुळे घराच्या मुख्य दरवाज्यावर कधीच शूज काढू नये.
Image credits: Getty
Marathi
आयुष्यात समस्या उद्भवतील
वास्तुनुसार, सकारात्मक उर्जा घरातील मुख्य प्रवेशद्वारातूनच येते. येथेच अस्वच्छता असल्यास व्यक्तीला आयुष्यात समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
Image credits: Getty
Marathi
शूज-चप्पल ठेवण्याची योग्य जागा
वास्तुनुसार, घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला शूज-चप्पल ठेवावेत. यामुळे कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही.
Image credits: Getty
Marathi
DISCLAIMER
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.