देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा रविवारी महाराष्ट्रात विस्तार झाला. यावेळी पंकजा मुंडे यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.
पंकजा या दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. 2014 ते 2019 या काळात त्या फडणवीस सरकारमध्ये मंत्री होत्या.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार पंकजा मुडे यांच्याकडे सुमारे 46.11 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, पंकजा मुंडेंकडे 6 कोटी 17 लाख 58 हजार 708 ची जंगम मालमत्ता असून त्यात बँकांमध्ये ठेवलेल्या रोख रकमेशिवाय कंपन्यांचे बाँड, शेअर्स, सोने यांचा समावेश आहे
पंकजा मुंडे यांच्याकडे 450 ग्रॅम सोने आणि 4 किलो चांदी आहे. याशिवाय 2.30 लाख रुपयांचे इतर दागिनेही आहेत.
पंकजा मुंडे यांचे पती डॉ. चारुदत्त पालवे यांच्याकडे 13 लाख रुपये किमतीचे 200 ग्रॅम सोने आणि दोन किलो चांदी आहे.
पंकजा मुंडे यांचे पती चारुदत्त पालवे यांनीही डॉ. प्रीतम मुंडे यांच्याकडून ६५ लाख आणि यशश्री मुंडे यांच्याकडून ३५ लाखांचे कर्ज घेतले आहे.
यावेळी पंकजा मुंडे यांनी विधानसभा निवडणूक लढवली नाही. मात्र, त्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्या आहेत. एप्रिल 2024 मध्ये बीडमधून त्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्या.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा परळी मतदारसंघातून चुलत भाऊ धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव झाला. आता फडणवीस सरकारमध्ये दोन्ही भाऊ-बहीण मंत्री झाले आहेत.