केसांच्या आरोग्याकडे वेळीच लक्ष न दिल्यास केस गळती, केस मूळांपासून तुटणे, कोरडे होणे अशा समस्या उद्भवू शकतात. अशातच वर्किंग वुमनने केसांची काळजी कशी घ्यावी याबद्दल जाणून घेऊया.
Image credits: pinterest
Marathi
केस घट्ट बांधू नका
ऑफिसला जाण्याच्या धावपळीत बहुतांश महिला केस कसेही बांधतात किंवा पोनीटेल बांधतात. पण घट्ट पोनीटेलमुळे केस तुटण्याची समस्या वाढली जाऊ शकते.
Image credits: pinterest
Marathi
केसांना तेल लावा.
केसांची योग्य काळजी घेण्यासाठी केसांना आठवड्यातून दोनदा कोमट गरम करुन तेल लावावे. यामुळे केस मुळापासून मजबूत होतात.
Image credits: pinterest
Marathi
कंडिशनरचा वापर
केस मऊ आणि सिल्की होण्यासाठी केस शॅम्पूने धुतल्यानंतर कंडिशनरचा वापर केला पाहिजे. जेणेकरुन केसांचेही आरोग्य राखले जाईल.
Image credits: unsplash
Marathi
सतत हेअर वॉश करणे टाळा
सतत हेअर वॉश केल्याने केस कोरडे होतात. याशिवाय केसांची चमक दूर होते. यामुळे आठवड्यातून दोनदाच हेअर वॉश करा.
Image credits: unsplash
Marathi
सतत केस मोकळे सोडू नका
वर्किंग वुमनने सतत केस मोकळे सोडू नका. यामुळे केसांमध्ये धूळ, घाण जमा झाल्यास आणि वेळोवेळी केस न धुतल्यास केसांसंदर्भात समस्या उद्भवू शकतात.
Image credits: unsplash
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.