उन्हाळ्याची गरमी, घामाने ओलसर शरीर, थकलेले मन याच्याशी लढण्यासाठी संध्याकाळी आंघोळ करणे ही ताजी हवा आहे. हे फक्त थंडावा मिळवण्याचं साधन नसून याचे फायदे आहेत?, त्याबद्दल जाणून घेऊ
उन्हाळ्यात गरमीमुळे शरीरात उष्णता वाढते, अस्वस्थता जाणवते. संध्याकाळी आंघोळ केल्याने शरीर थंडावते, मनःशांती मिळते. थंड पाणी शरीरातील उष्णता कमी करून ताजेतवाने वाटण्यास मदत करते.
गरमीमुळे झोपेची गुणवत्ता कमी होते. संध्याकाळी आंघोळ केल्याने शरीराचे तापमान संतुलित होते, आणि मन रिलॅक्स होते. यामुळे झोप येण्यास मदत होते आणि तुम्ही ताजेतवाने जागे होता.
गरमीने शरीरावर घाम, धूळ, घाण साठते. यामुळे त्वचेला रॅशेस, पुरळ आणि अॅलर्जीची समस्या उद्भवू शकते. संध्याकाळी आंघोळ केल्याने या सर्व त्रासांपासून आराम मिळतो आणि त्वचा स्वच्छ राहते.
उन्हाळ्यात जास्त घाम येणं आणि तेलकट त्वचा यामुळे त्वचेच्या पोर्स बंद होऊ शकतात. आंघोळ केल्याने पोर्स स्वच्छ राहतात, त्वचेला हायड्रेशन मिळते आणि नैसर्गिक तेज वाढते.
संवेदनशील उन्हाळ्याच्या वातावरणात संध्याकाळी थंड पाण्याने आंघोळ केल्याने तणाव कमी होतो आणि मन शांत होते. हे तणावमुक्तीचं एक नैसर्गिक साधन आहे.