कोरफड जेल थेट डोळ्याखाली लावून हलक्या हाताने मसाज करा. 10-15 मिनिटांनी थंड पाण्याने धुवा. कोरफड त्वचेला मॉइश्चर देते आणि थंडावा देते.
दोन स्टीलचे चमचे फ्रीजमध्ये 10-15 मिनिटे ठेवा. हे थंड चमचे डोळ्यांवर ठेवा आणि हलकासा दाब द्या. डोळ्याभोवतील सूज कमी होते आणि ब्लड सर्क्युलेशन सुधारते.
बटाट्याचा रस कापसाच्या मदतीने डोळ्याखाली लावा. 15-20 मिनिटांनी स्वच्छ धुवा. नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्मामुळे त्वचा उजळते.
थंडगार काकडीच्या चकत्या डोळ्यांवर ठेवा आणि 15 मिनिटे विश्रांती घ्या. काकडी त्वचेला थंडावा देऊन काळसरपणा कमी करते.
1 टीस्पून लिंबाचा रस + 1 टीस्पून मध मिसळून डोळ्याखाली लावा. 10-15 मिनिटांनी स्वच्छ धुवा. त्वचा उजळते आणि काळसरपणा कमी होतो.
वापरलेले ग्रीन टी किंवा ब्लॅक टी बॅग्ज थंड करून डोळ्यांवर ठेवा. 15-20 मिनिटांनी काढून टाका. चहा मध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे काळी वर्तुळे कमी करण्यास मदत करतात.
कापूस थंड दुधात किंवा गुलाबपाण्यात भिजवून डोळ्यांवर ठेवा. 15 मिनिटांनी स्वच्छ धुवा. त्वचेला थंडावा मिळतो आणि टवटवीत वाटते.