Marathi

पनीरपासून आपण ब्रेकफास्ट साठी काय बनवू शकतो?

Marathi

पनीर पराठा

पनीर किसून त्यात हिंग, मिरपूड, कोथिंबीर, मीठ आणि थोडासा आल्याचा रस घालून मिश्रण तयार करा. गव्हाच्या पीठाची पोळी लाटून त्यात हे मिश्रण भरून पराठा तव्यावर तेल किंवा तूप घालून भाजा. 

Image credits: Social Media
Marathi

पनीर सँडविच

ब्रेडच्या स्लाइसवर लोणी लावा. किसलेला पनीर, मिरी पूड, चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेला कांदा किंवा शिमला मिरची घालून मिश्रण तयार करा.

Image credits: Freepik
Marathi

पनीर भुर्जी

तूप किंवा तेल गरम करून त्यात जिरं, आले-लसूण पेस्ट, कांदा, टोमॅटो आणि मिरच्या परतून घ्या. त्यात किसलेला किंवा चुरलेला पनीर घालून मसाले टाका आणि मिक्स करा.

Image credits: Freepik
Marathi

पनीर उपमा

रवा भाजून घ्या आणि त्यात पनीराचे छोटे तुकडे घाला. मोहरी, कढीपत्ता, मिरची आणि कांदा परतून घ्या. गरम पाण्यात हे सगळे मिसळून शिजवा आणि लिंबू रस घालून सर्व्ह करा.

Image credits: Freepik
Marathi

पनीर पोहा

पोहा पाण्यात धुऊन बाजूला ठेवा. कढईत तेल गरम करून मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची, कांदा आणि पनीर घालून परता. त्यात हलक्या हाताने पोहा मिसळा, मीठ आणि मसाले घाला. 

Image credits: Freepik
Marathi

पनीर डोसा

डोसा तव्यावर घालून त्यावर मसालेदार पनीर भुर्जी पसरवा. रोल करून गरमागरम सांबार आणि चटणीसोबत खा.

Image credits: Freepik
Marathi

पनीर स्मूदी / शेक

पनीर, दूध, मध आणि केळी किंवा स्ट्रॉबेरी ब्लेंड करून स्मूदी तयार करा. हे प्रोटीन-युक्त आणि एनर्जेटिक पेय आहे.

Image credits: Freepik
Marathi

पनीर ऑमलेट

बेसन किंवा रवा, चुरलेला पनीर, कांदा, टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीर मिक्स करून पिठाचे मिश्रण तयार करा. तव्यावर पसरून दोन्ही बाजूंनी कुरकुरीत भाजा.

Image credits: Freepik

Holi 2025 Recipes : होळीच्या नैवेद्यासाठी तयार करा हे 5 गोडाचे पदार्थ

उन्हाळ्यात दररोज ताक पिण्याचे फायदे काय? घ्या जाणून

मम्मीची साडी वापरून बनवा बगरू बटिक प्रिंट लहंगा, मिळवा 100% कंम्फर्ट

कडक उन्हाळ्यात कूल लुक!, ऑफिससाठी 1K मध्ये निवडा श्रीलीलासारखी साडी