दररोज एकाच वेळी झोपा आणि उठण्याची सवय लावा. शरीराला नैसर्गिक बायोलॉजिकल क्लॉक असतो, जो ठराविक वेळेला झोपण्याने सुधारतो.
झोपण्याच्या १ तास आधी फोन, टीव्ही आणि लॅपटॉप बंद करा. स्क्रीनमधून येणारे ब्लू लाईट मेलाटोनिन (झोपेचे हार्मोन) कमी करते, त्यामुळे झोप लागत नाही.
गरम दूधात हळद किंवा मध घालून प्यायल्यास मेंदू शांत राहतो. कॅमोमाईल टी किंवा गवती चहा (Lemongrass Tea) घेतल्यास झोप चांगली लागते.
तूप किंवा नारळ तेलाने हलकी मालिश केल्यास मेंदूला आराम मिळतो. यामुळे झोप पटकन लागते आणि थकवा दूर होतो.
गरम पाण्याने अंघोळ केल्याने शरीरातील तणाव कमी होतो. स्नायूंना आराम मिळतो आणि झोप पटकन लागते.
अंथरुणावर फोन वापरणे, टीव्ही पाहणे, काम करणे टाळा. त्यामुळे मेंदू अंथरुणाशी झोपण्याचा संबंध जोडतो आणि झोप पटकन लागते.
झोपण्याच्या ४ तास आधी कडधान्य, मांसाहार किंवा तळकट अन्न टाळा. रात्री चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक्स घेणे टाळा कारण त्यामुळे मेंदू सक्रिय राहतो.