रात्र म्हणजे शरीर विश्रांती घेण्याचा काळ. त्यामुळे रात्रीचा आहार हलका असावा, नाहीतर गॅस, अपचन, झोपेचा त्रास होतो.
मूग डाळ + भात = पचायला उत्तम कॉम्बिनेशन असत. रात्री खाल्ल्यास झोपही चांगली लागते.
साधं वरण-भात हे सगळ्यात हलकं आणि आरामदायी जेवण आहे. जास्त तूप किंवा तिखट न घालता बनवलेलं उत्तम असतं.
गरमागरम सूप पचन सुधारतं आणि शरीराला विश्रांती मिळते. विशेषतः पावसाळ्यात किंवा थंडीच्या रात्री सर्वोत्तम असतं.
साधा फुलका आणि कोरडी भाजी – जसं की कारली, दोडका, भेंडी आपण खाऊ शकता. पचनासाठी हलकं आणि फायबरयुक्त जेवण चांगलं असत.
दही पचन सुधारतं, पण थंडी किंवा सर्दी असलेल्या लोकांनी टाळावं. रात्री गरम पाण्याबरोबर थोडंसं दही चालू शकतं.
रात्री झोपण्याआधी गरम दूध शांत झोपेसाठी मदत करतं. हळद किंवा पिंपळी घालून घेतल्यास पचन सुधारतं.
जड तेलकट अन्न, लोणचं, फास्टफूड, मिरची जास्त असलेले पदार्थ रात्री टाळा. हे अन्न अपचन, गॅस, आणि झोप न लागण्याची कारणं ठरतात.
अपूर्वा अरोराचे 6 लूक करा कॉपी, खुलेल सौंदर्य
Chanakya Niti: नवरा बायकोच भांडण झाल्यावर काय करावं, चाणक्य सांगतात
रात्री ड्रायफ्रूट भिजून खाल्यामुळे शरीराला काय फायदा होतो?
एक लाख पगार असणाऱ्या व्यक्तीनं कोणती कार खरेदी करायला हवी?