वाचन करा – आवडते पुस्तक, लेख किंवा नवीन माहिती मिळवा. ध्यान (मेडिटेशन) आणि योगा करून मन शांत ठेवा. आपले छंद जोपासा – लेखन, संगीत, चित्रकला किंवा बागकाम करा.
कुटुंबीयांसोबत छान नाश्ता किंवा जेवण करा. मित्रांसोबत गप्पा मारा किंवा बाहेर फिरायला जा. मुलांसोबत खेळा किंवा त्यांच्या अभ्यासात मदत करा.
मॉर्निंग वॉक, रनिंग किंवा सायकलिंग करा. एखाद्या रिसॉर्ट, उद्यान किंवा समुद्रकिनारी जाऊन नैसर्गिक वातावरणाचा आनंद घ्या. आरोग्यसाठी डिटॉक्स डायेट किंवा हेल्दी ड्रिंक्स घ्या.
खोली स्वच्छ करा आणि गरजेच्या वस्तू व्यवस्थित लावा. कपडे, पुस्तकं आणि जुनी सामानं व्यवस्थीत करा. आठवड्याच्या जेवणाची योजना करा आणि किराणा माल आणा.
नवीन कौशल्य शिका – ऑनलाइन कोर्सेस करा, नवीन भाषा शिका किंवा टेक्नॉलॉजीविषयी जाणून घ्या. आर्थिक नियोजन करा – मासिक खर्चाचा आढावा घ्या आणि बचतीचे नियोजन करा.
आवडती सिनेमा किंवा वेब सिरीज बघा. संगीत ऐका आणि रिलॅक्स व्हा. प्रवासाची योजना करा आणि नवीन ठिकाणे एक्सप्लोर करा.
एखाद्या NGO मध्ये मदत करा किंवा समाजोपयोगी कार्य करा. गरजू लोकांना मदत करण्यासाठी वस्त्रदान किंवा अन्नदान करा.