एकाग्रता वाढवण्यासाठी काय करता येईल, मार्ग जाणून घ्या
Lifestyle Jan 18 2025
Author: vivek panmand Image Credits:Getty
Marathi
शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारा
10-15 मिनिटे ध्यान किंवा योग केल्याने मन शांत राहते आणि लक्ष केंद्रित करणे सोपे होते. 7-8 तासांची शांत झोप ही मेंदूसाठी आवश्यक आहे. झोपेची कमतरता एकाग्रता कमी करू शकते.
Image credits: Getty
Marathi
नियोजन आणि शिस्त
दिवसातील कामे प्राधान्याने करा. एकावेळी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. एखाद्या कामासाठी ठराविक वेळ ठेवा आणि त्या वेळेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.
Image credits: Getty
Marathi
विचलित करणाऱ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवा
काम करताना फोन आणि सोशल मीडिया वापर टाळा. वाचन किंवा कामासाठी शांत आणि विचलनमुक्त जागा निवडा.
Image credits: Getty
Marathi
स्मरणशक्ती सुधारण्यासाठी तंत्रे वापरा
बोलणे किंवा वाचन करताना पूर्णपणे लक्ष केंद्रीत करा. महत्त्वाचे मुद्दे लिहून ठेवल्यास लक्ष चांगले केंद्रित होते.
Image credits: Getty
Marathi
व्यायाम आणि विश्रांती
दररोज 30 मिनिटे हलका व्यायाम किंवा चालणे मेंदूला स्फूर्ती देते. ताणतणाव कमी करण्यासाठी मसाज, गरम पाण्याने आंघोळ, किंवा प्राणायाम यांचा अवलंब करा.
Image credits: Getty
Marathi
सकारात्मक दृष्टीकोन ठेवा
"मी करू शकतो" हा विचार मनात बाळगा. दीर्घकालीन आणि अल्पकालीन उद्दिष्टे ठरवून त्या दिशेने काम करा.
Image credits: Getty
Marathi
विशिष्ट सवयी जोपासा
दररोज काही मिनिटे वाचन करा; यामुळे मनाची चंचलता कमी होते. नवीन कौशल्ये आत्मसात केल्याने मेंदूची क्षमता वाढते.